बाळापूर : – डॉ नानासाहेब चिंचोळकर माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल ९५ टक्के लागला असुन गायत्री गजानन पवार या विद्यार्थिनीने ७२.८० टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे तसेच शेख शाहीद शेख चांद (पत्रकार ) या विद्यार्थ्याने एकूण ६९.८० टक्के गुण प्राप्त करून विद्यालयातून दुतिय क्रमांक मिळविला आहे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामुळे डॉ नानासाहेब चिंचोळकर विद्यालयचे संस्थाध्यक्ष तथा जि.प. सदस्य श्री चंद्रशेखर ऊर्फ नारायण चिंचोळकर, सचिव जगदीश चिंचोळकर, संचालक मंडळ, मुख्यद्यापक श्री आर. व्ही. मसने, वर्गशिक्षक श्री के .व्ही नानोटी तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आई , वडीलांना यशाचे श्रेय देत आहे. संस्थाध्यक्ष तथा जि.प. सदस्य श्री चंद्रशेखर चिंचोळकर, संचालक मंडळ मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे