-शेतकऱ्यांना झाला मनस्ताप
अकोला जिल्हा कृषी अधीक्षक कांतापा खोत यांच्या जाचाला कंटाळून शनिवारी अकोला जिल्यातील 400 पेक्षा जास्त कृषी सेवा केंद्र संचालकांनी बंद पुकारला. या बंद मुळे शेतकऱ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे.अकोला जिल्हा कृषी अधीक्षक कांतापा खोत याचा जाचाला कंटाळून आज अकोला जिल्यातील 400 पेक्षा जास्त कृषी सेवा केंद्र संचालकांनी बंद फुकारला असून जिल्यातील सर्व कृषी केंद्र आज बंद ठेवण्यात आले आहे, जिल्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या पेरणी करीता लगबग सुरू केली असून बहुतांश शेतकरी कृषी सेवा केंद्रांवर आज फवारणी औषधी, विविध खत तसेच काही बीयाने खरेदी करिता आले असता त्यांना कृषी केंद्र बंद दिसल्याने सदर शेतकऱ्यांना नैराश्याने आल्या पायी परत जावे लागले, अकोला जिल्हा कृषी अधीक्षक कांतापा खोत हे विनाकारण जिल्यातील जिल्यातील छोट्या मोठ्या कृषी केंद्र संचालकांना विनाकारण लायनस रद्द करण्याची धमकी देतात तसेच बहुतांश कृषी केंद्र संचालकांना पैशाची मागणी करीत आहे याच बरोबर शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असून शेतकऱ्यांना शासनाच्या योजना पाऊण ते वंचित ठेवत असल्याचा आरोप या वेळी कृषी केंद्र संचालकांनी आर.आर.सी. न्युज शी बोलताना व्यक्त केले, याच बरोबर जिल्हा कृषी अधीक्षक कांतापा खोत यांची सखोल चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करीत त्यांच्या मालमत्तेची सुद्धा कसून चौकशी करीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी अकोला जिल्हा कृषी सेवा केंद्र संघटनेचे अध्यक्ष मोहन सोनोने यांनी केली