मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयावर ईडीची धाड; सापडलं पैशांचं घबाड; अधिकाऱ्यांचे डोळे दिपले

ताज्या घड्यामोडी

रांची: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय हेमंत सोरेन यांची निकटवर्तीय पंकज मिश्रा यांच्याशी संबंधित मालमत्तांवर सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी छापे टाकले. मिश्रा आणि त्यांच्याशी संबंधित काही जणांच्या मालमत्तांवर ईडीनं धाडी टाकल्या. एकूण १८ जण छापे टाकण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. साहिबगंज जिल्ह्यातील बरहेट आणि राजमलमध्ये धाडी टाकण्यात आल्या.

ईडीनं १८ ठिकाणी छापे टाकत तब्बल ३ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. ईडीनं हस्तगत केलेल्या नोटांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुक्रवारी पंकज मिश्रा यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर ईडीनं छापे टाकले. खाण घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. मिश्रा यांचे निकटवर्तीय असलेल्या हिरा भगत यांच्या घरावरदेखील छापा टाकण्यात आला. भगत यांच्या घरात ईडीला घबाड सापडलं. बराच वेळ पैशांची मोजदाद सुरू होती.

ईडीनं एकूण ३ कोटींची रोख रक्कम जप्त केल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईवरून भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी ट्विट करून पंकज मिश्रा यांना टोला लगावला. ‘सकाळपासून पत्रकारांनी त्रास दिला आहे. त्यांचीच माहिती सर्वसामान्य जनेतपर्यंत पोहोचवत आहे. पंकज पळू शकला नाही? अखेर ईडीची छापेमारी त्याच्याकडे सुरू झाली. बिचारा वाट पाहत होता, मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधीदेखील आहे’ असा चिमटा दुबेंनी काढला.ईडीनं एकूण ३ कोटींची रोख रक्कम जप्त केल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईवरून भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी ट्विट करून पंकज मिश्रा यांना टोला लगावला. ‘सकाळपासून पत्रकारांनी त्रास दिला आहे. त्यांचीच माहिती सर्वसामान्य जनेतपर्यंत पोहोचवत आहे. पंकज पळू शकला नाही? अखेर ईडीची छापेमारी त्याच्याकडे सुरू झाली. बिचारा वाट पाहत होता, मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधीदेखील आहे’ असा चिमटा दुबेंनी काढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *