पाणलोट क्षेत्रात पावसाचा अभाव मोठा
अकोल्याचा पाणी पुरवठा काटेपुर्णातून
अकोला : शहरात,अकोला जिल्ह्यात इतरत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. पण, वाशिम जिल्ह्यातील मुख्यतः काटेपुर्णा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पावसाचे म्हणावे तसे आगमन झाले नाही. त्यामुळे धरणाची पातळी वाढली नसलल्याचे चित्र आहे.
गेल्या दोन दिवसा व त्या पुर्वी देखील अकोला शहर व जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. पण, अकोला शहराला पाणी पुरवठा करणाNया काटेपुर्णा धरणाची परिस्थिती जैसे थे आहे. या धरणातील साठा अद्याप वाढला नाही. वाशिम जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाचे आगमन झाले की, काटेपुर्णा धरणात पाणीसाठा तयार होतो. यंदा वाशिम जिल्ह्यातील लाभक्षेत्रात अद्याप पावसाचे म्हणावे तसे आगमन झाले नाही. त्यामुळे अकोला शहराला पाणी पुरवठा करणाNया काटेपुर्णा धरणात पाणीसाठा जैसे थे असून अद्याप त्यात भर पडली नाही. अकोलेकरांनी धरणातील पाणीसाठा पाहता पाणी जपून वापरण्याची गरज व्यक्त केली जात आहे.