हातरून : नियोजन शून्य शासन आणि प्रशासन असल्यामुळे आज ग्रामीण भागात आज विविध समस्या तोंड वर करतांना दिसत आहे. पावसाआधी करावयाचे काम प्रशासनाद्वारे पूर्ण न होऊ शकल्याने आज बाळापूर तालुक्यातील उरळ खुर्द झुरळ खुर्द या गावावर मोठे संकट उभे राहिले आहे. मात्र शासनआजही हातावर हात ठेऊन शांत बसले असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाने चांगलाच तडाखा लावला आहे या मध्ये अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे हीच परिस्थिती आज बाळापूर तालुक्यात दिसत आहे. या ठिकाणी मुसळधार पावसामुळे तालुक्यातील कारंजा डॅम पाणलोट क्षेत्रात येत असलेल्या उरळ खुर्द झुरळ खुर्द चा उरळ बुद्रुक आणि झुरळ बुद्रुक शी पूर्णपणे संपर्क तुटला आहे परिसरातील शेतकरी, शाळकरी विद्यार्थी, रुग्ण व गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे.गावकऱ्यांच्या वतीने प्रस्तावित पुलाचे नवनिर्माण चे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत वारंवार सांगूनही पूर्ण केले नाही तसेच पुलाची निर्मिती झाल्यानंतर पाणी अडवण्यासंदर्भात वेळोवेळी निवेदन दिले मात्र या बाबत शासनाने नागरिकांच्या निवेदनाला वेळोवेळी केराची टोपली दाखवली, मात्र प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आहे या ठिकाणी दोन गावाचा संपर्क तुटला असून दोन्ही गावाच्या ग्रामस्थांना विविध समस्यांना आज सामोरे जावे लागत आहे या ठिकाण निर्माण केलेल्या समस्या मुळे जीवित हानी देखील होऊ शकते हे नाकारता येत नाही या ठिकाणी कोणतीही जीवित हानी झाल्यास सर्वस्वी जबाबदार शासन आणि प्रशासन राहील असा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत