ठाणे – पावसाला सुरुवात होताच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठून अपघाताच्या घटना घडत आहेत. तर, मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील डांबर वाहून रस्त्यांत खड्डेही पडत आहेत. ठाणे जिल्ह्यातील खड्ड्यांचा प्रश्नही चांगलाच समोर आला. ठाण्याचे नेते आणि बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनीमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ठाण्याच्या रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. तर, दुसरीकडे ठाण्यातील खड्ड्यांवरुन जनतेत तीव्र नाराजी आहे. आता, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या कल्याणमधील एका बस ड्रायव्हरचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.