मुंबई, ठाण्यात आणखी तीन दिवस मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज, सतर्कतेचा इशारा 

Maharashtra State

मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस कायम असून, आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

मुंबई : मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस कायम असून, आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  सतर्कतेचा इशाराही (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. सध्या गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत द्रोणीय क्षेत्र आहे. परिणामी, सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत (गेल्या २४ तासांत) कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार पाऊस तर, काही ठिकाणी मध्यम पाऊस कोसळला. विदर्भात पावसाने थैमान घातले आहे. मुंबईतही मंगळवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांत सोमवारी सकाळी पावसाची रिपरिप होती. अधून-मधून जोरदार सरीही कोसळल्या. सायंकाळपर्यंत शहर आणि उपनगरांत तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत सांताक्रूझ केंद्रात ९.२ मि.मी., तर कुलाब्यात ११.७ मि.मी. पावसाची नोंद झाली.

पाऊसवेध….

राज्यातील बहुतांश भागांत पुढील आठवडाभर कमी-अधिक प्रमाणात पावसाचा अंदाज.
मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत मुसळधार, तर पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा.
पुणे, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यांतही दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा, साताऱ्यात मुसळधार.
’औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आदी भागांत मुसळधार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *