उभ्या पिकावर फिरवला शासनाने ट्रॅक्टर

अकोला


१८ शेतकरी कुटुंबांवर आत्महत्या करण्याची वेळ
-जिल्हा प्रशासनाने आत्महत्या करण्यास भाग पाडले

अकोला तालुक्यातील वडद बुजरूक येथील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या जमिनीवर प्रशासनाने ट्रॅक्टर फिरून पिकाचे नुकसान केल्या बाबत जिल्हा प्रशासनाच्या बाबत बळीराजाच्या मनात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे, आम्हा शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासन आत्महत्या करायला भाग पाडत असल्याचा गंभीर आरोप या वेळी बळीराजाने केला आहे.

अकोला तालुका अंतर्गत येत असलेल्या वडद बुजरूक येथील भूमिहीन शेतकऱ्यांनवर उपास मारीची वेळ आली असून जिल्हा प्रशासनाने त्यांनी पेरणी केलेल्या जमिनीवर ट्रॅक्टर फिरवल्याने त्याच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाल्याचे समजते, वडद बुजरुग येथील भूमिहीन असलेले 18 शेतकरी हे गेल्या 80 वर्षांपासून इ क्लास जमिनीवर पेरणी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहे, या वर्षी जिल्हा प्रशासनाने त्यांच्या पेरणी करण्याच्या इ क्लास जमीनीवर वृक्ष लागवड करायचे म्हणून सदर शेतकऱ्यांना पेरणी पासून वंचित ठेवले तर ज्या शेतकऱ्यांनी त्या भागातील जमिनीवर पेरणी केली त्या वर ट्रॅक्टर फिरवून संपूर्ण पीक जमीनधोस्थ केल्याने 18 शेतकरी कुटुंबांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे सांगण्यात येत आहे, वडद येथील 18 शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून बियाणे, खत तसेच फवारणी औषध विकत आणले परंतु जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर केलेल्या अन्याय नंतर त्यांच्याकडे आत्महते शिवाय कोणताच पर्याय उरला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले, एकीकडे राज्य शासन शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवन्या करीता उपयोजना करीत आहेत. त्यात वडद येथील शेतकऱ्यांवर जिल्हा प्रशासनच अन्याय करीत असल्याने जिल्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे.

1 thought on “उभ्या पिकावर फिरवला शासनाने ट्रॅक्टर

  1. खुप खुप छान आहे.सिटी चाणल गरीबांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला आहे.त्या बध्दल आम्ही सर्व वडद बु, येथील भुमीहीन शेतमजूर आम्ही सिटी चानल चे आभारी आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *