गुरुपौर्णिमा निमित्त शेगावात भाविकांची गर्दी,
रिमझिम पावसात ही भाविक शेगावात दाखल
‘गुरुने दिला ज्ञानरुपी वसा… आम्ही चालवू हा पुढे वारसा’ गुरुचे अस्तित्व प्रत्येकाच्या आयुष्यात दिशादर्शकाचे काम करते. बुधवार 13 जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळाली.
बुधवार 13 जुलै रोजी गुरु पौर्णिमा निमित गुरु बंधू आपल्या गुरुचे दर्शन घेतात आणि आशीर्वादही घेतात. या निमित्त राज्यातील भाविक दर्शनासाठी संतनगरी शेगाव ला येतात. तर काही भाविक दूरवरून दरवर्षी पायी वारी करतात. यामुळे मंदिराच्या परिसरामध्ये भक्तांची गर्दी जमते. शेगांव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरातसुद्धा बुधवार सकाळपासून गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमल्याचे पाहायला मिळाले. तर विदर्भातील काही पत्रकार पुणे स्थित साईधाम कान्हे येथे गेले असता साई मंदीरात त्यांना साईबाबांच्या आऱतीचा लाभ मिऴाला