विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

अकोला

अकोला,दि.१३- भारतीय हवामान विभाग यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. १७ जुलैपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ७६ ते १०० मि.मी इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 पुरापासून बचावासाठी नागरिकांनी खालील प्रमाणे काळजी घ्यावी.

या कालावधीत नदी नाला काठावरील गावांना व शहरी भागातील सखल भागातील वस्त्यांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी, नाले, तलाव, बंधारे येथे जलसाठा जमा होत असल्याने त्यामध्ये पोहण्यास जाऊ नये. रस्त्यावरून, पुलावरुन पाणी वाहत असल्यास वाहने नेण्याबाबत दक्षता घ्यावी. तसेच स्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी,असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *