शाळांच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थ्यांवर परिणाम
फक्त भूमिपूजन करण्याकरिता जिल्हाप्रशासनाचा दिखावा
सध्या पावसासोबत शालेय प्रक्रिया चांगलीच जोर घेत आहे. यावेळी पावसामुळे अनेक शाळांची परिस्थिती समोर आली असून शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.
शहारा जवळ असलेल्या शिवनी परिसरातील जिल्हा परिषदच्या शाळेची अवस्था दयनीय झाली आहे. वर्ग खोल्यांमध्ये पावसाच्या पाण्याची गळती लागलेली आहे. या वर्ग खोल्यांमध्ये वर्गातील थंडावा मुळे शिकवत असणाऱ्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांची प्रकृतीवर परिणाम पडल्याचे दिसून येत आहे. शिवनी परिसरातील शाळेच्या 3 वर्ग खोल्या शिकस्त असल्याने त्या पाडण्यात आल्या त्याच बरोबर त्या वर्ग खोल्या असलेल्या जागी इमारत बांधून अनेक वर्ग खोल्या बांधण्याचे मानस जिल्हा परिषद शासन प्रशासन कडून भूमिपूजन पण शाळा सुरू होण्यापूर्वी करण्यात आले. शाळा तर सुरू झाली पण कुठल्याही प्रकारची निर्माण कार्याला सुरुवात जिल्हा परिषदेच्या शाळेत झाली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन फक्त उदघाटन ,भूमिपूजन व इतर प्रसिद्धी वाहवाही कडे वळली असल्याचे दिसत आहे. एवढ्या समस्या असताना शिकवणाऱ्या शिक्षकांकडे व शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पावसाच्या परिस्थितीत दुर्लक्षित केलेले दिसून येत आहे.