पिंपलडोळी येथिल नदीवरील पूल गेला वाहून
पूल वाहून गेल्याने 11 गावचा संपर्क तुटला आहे
वाहतूक झाली विस्कळीत
पातूर तालुक्यांतील व जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी बहुल अकारा गावचा संपर्क तुटला आहे. पिंपलडोळी येथिल निर्गुना नाल्याला आलेल्या पुरामुळे येथील पूल वाहून गेला आहे. त्या मुळे येथील वाहतूक विस्कळित झाली आहे.
पातूर व अकोला दरम्यान येण्या जाण्याचा हा ऐकमेव मार्ग आहे. या परिसारात पूर आल्याने परिसरातील पूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. एखादा दवाखान्या संबंधी जाण्या येण्याची परिस्थिती उद्भवल्यास येण्या जाण्याकरिता कोणताही दुसरं मार्ग नसल्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. पांढुर्णा, पिंपलडोळी, पेडका, नवीन वस्ती, चोंडी, चारमोळी धरण, घोटमाल, अंधार सांगवी, इत्यादि गावांचा संपर्क तुटला आहे. दरवर्षी हा पुल मुसळधार पाऊस आल्याने वाहुन जातो. त्यावर लोकप्रतिनिधी व अधिकारी येऊन पाहणी करतात परंतु त्यावर कोणतीही योग्य ती उपाय योजना होत नाही फक्त वेळ निघून जावी एवढा काय तो मार्ग बनवल्या जात आणि पुढील वर्षी हा पुल पुन्हा वाहुन जातो. प्रत्येक वर्षी असेच सुरु असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सदर पुल हा कायम स्वरुपी बांधून द्यावा अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. सदर नदीवरील पुल हा नाबार्ड 27 अंतर्गत मंजूर झालेला आहे. याविषयी पुढील आठवड्यामध्ये कामाची वर्क ऑर्डर काढण्यात येईल व लवकर कामाला सुरवात करण्यात येणार आहे अशी माहिती कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांनी दिली आहे. या संदर्भात शिवसेना आमदार नितीन देशमुख, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, तहसीलदार दीपक बाजड, मंडळ अधिकारी अमित सबनीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हेमंत राठोड प्रशांत देशमुख सरपांच रवींद्र मुर्तडकर तालुका प्रमुख सह ईतर अधिकरी कर्मचारी इत्यादींनी पाहणी केली.