बाळापुर : बाळापुर येथील नगर परिषदेचे मुख्यधिकारी पद हे गेल्या सात ते आठ महिन्यापासुन रिक्त होते.तेव्हा पासुन पदभार नायब तहसिलदार सुरळकर यांचा कडे प्रभारी नगर परिषद मुख्याधिकारी म्हणुन तात्पुरता प्रभार होता.बाळापूरचे तत्कालीन मुख्याधिकारी गोपीचंद पवार यांची तेल्हारा येथे बदली करण्यात आली होती.तेव्हा पासुन हे पद रिक्त होते.त्यांच्या जागी प्रभारी मुख्यधिकारी म्हणुन सुरळकर काम पाहत होते.नवनियुक्त मुख्याधिकारी शेषराव ताले हे आज रुजु झाले असुन प्रभार स्विकारतांना म्हणाले की शहरांतील प्रमुख समस्या साफसफाई आरोग्य आणि शासनाने बंदी करण्यात आलेल्या प्लास्टीक बंदी स्वच्छ भारत अभियान यांच्यासह संपूर्ण जबाबदारीने काम करेल असे ताले यांनी प्रभार स्विकारतांना बोलत होते.यावेळी त्यांचा नगरपरिषद सर्व कर्मचारी यांचा वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.