मिनी मंत्रालयाच्या पदांसाठी सदस्यांचा जोर
पदांसाठी कोणाची लागणार वर्णी?
जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती यांच्या आगामी निवडणुकांवर स्थगिती मिळाली असली तरीही सत्तेत असलेली वंचित बहुजन आघाडी यांनी हि स्थगिती काही काळासाठी राहणार यासाठी सदस्यांचे वयक्तिक परीक्षण केले.
आगामी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या तसेचह पंचायत समितीच्या पदांच्या निवडणुकांवर 3 महिन्याची स्थगिती मिळाली असली तरीही जिल्हा परिषदेच्या सत्तेत असलेल्या वंचित बहुजन आघाडीने हि स्थगिती 3 महिन्यावर राहणार नसून कमीत कमी कालावधीत जिल्हा परिषदेच्या तसेच पंचायत समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापती उपसभापती यांची निवडणूक होईल या विश्वासावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व सदस्यांची वयक्तिक मुलाखत घेण्यात आली. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती यांच्या शासकीय निवास्थानी ही बैठक तसेच मुलाखत पार पाडली. ही मुलाखत घेण्यासाठी वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांचे आगमन झाले असून उपाध्यक्ष पदावर इच्छूक सदस्यांची नाराजी व दर्जा परीक्षण या एकल बैठकीत झाले आहे. या बैठकीत स्थानिक वंचित बहुजन आघाडीचे कुठलेही नेते पदाधिकारी यांची उपस्थिती नव्हती. तसेच या बैठकीसाठी स्थानिक पदाधिकारी आणि नेते यांच्यावर अविश्वास असल्याची चर्चा यावेळी रंगली होती. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे यांच्या कडे या बैठकीचे नियोजन देण्यात आले होते.