आजचं राशीभविष्य, शुक्रवार १५ जुलै २०२२

राशीभविष्य

आजचं राशिभविष्यानुसार वृषभ राशीच्या व्यक्तींनी गुंतवणूक सावधानतेने करावी. देवाणघेवाणीच्या बाबतीत अधिक सजग राहावे.

मेष:- स्वकर्तुत्ववार अधिक भर द्यावा. प्रयत्नाने बर्‍याच गोष्टी साध्य करता येतील. प्रगतीच्या दृष्टीने विचार करावा. कामातून समाधान मिळेल. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

वृषभ:-गुंतवणूक सावधानतेने करावी. देवघेवीच्या बाबतीत अधिक सजग राहावे. कलाक्षेत्राला चांगला काळ आहे. महिलांनी कलेला वाव द्यावा. जवळचे नातेवाईक भेटतील.

मिथुन:-बोलतांना संयम राखावा. फसव्या मित्रांपासून सावध राहावे. मनातील भ्रामक कल्पना काढून टाकाव्यात. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेऊ नका. आत्मविश्वास कायम ठेवावा.

कर्क:-मनातील धैर्य वाढवावे लागेल. आध्यात्मिक बाबी जाणून घ्याल. कार्यालयीन वातावरण उत्तम राहील. मनाची द्विधावस्था दूर करावी. शक्यतो कोणत्याही वादात पडू नका.

सिंह:-फार रोखठोक भूमिका घेऊ नका. सामंजस्याने परिस्थिती हाताळा. उगाच घुसमट होऊ देऊ नका. झोपेची तक्रार जाणवेल. हितशत्रूवर मात करता येईल.

कन्या:- दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवा. अधिकारी वर्गाचा सल्ला घेता येईल. वेळ हातची जाऊ देऊ नका. ज्येष्ठाशी सल्लामसलत करावी. हातच्या कामात यश येईल.

तूळ:- विरोधाला सामोरे जावे लागू शकते. मोठ्या कामात अधिक लक्ष घालावे. अनावश्यक खर्च त्रस्त करू शकतो. मनात उगाचच चिंता निर्माण होईल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल.

वृश्चिक:- अचानक आलेल्या संधीचे सोने करावे. काही जुगारी निर्णय घ्यावे लागू शकतात. कामाच्या विस्ताराचा विचार कराल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. क्रोधवृत्तीत वाढ होऊ शकते.

धनू:- आर्थिक गणित जमून येईल. जुनी गुंतवणूक कमी येईल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक कराल. आलेल्या संधीचे सोने करावे. कामात द्विधावस्था आड आणू नका.

मकर:- चिकाटी सोडून चालणार नाही. इतरांना मदत करण्याचा आनंद घ्याल. आपल्या कार्यक्षेत्रात प्रयत्नशील राहावे. अंगीभूत कलांना वाव द्यावा. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे.

कुंभ:- बोलतांना इतरांची मने दुखवू नका. वर्तमान काळाचा जास्त विचार करावा. सरकारी नियमांचे काटेकोर पालन करावे. सर्व बाबतीत प्रयत्नशील राहावे. नोकरदारांना दिलासा मिळेल.

मीन:- कार्यालयीन कामाबाबत अधिक दक्ष राहावे. कामाचा उत्साह वाढेल. वेळोवेळी ज्येष्ठाशी चर्चा करावी. क्रोधवृत्तीत वाढ होईल. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *