हायवे अंडरपास जवळ ट्रक फसला
प्रभात डे बोर्डिंगला द्यावी लागली सुट्टी
अकोला,१६ जुलै
पातुर मार्गावर असलेल्या अंडरपास जवळ शनिवारी सकाळी एक मोठा १२ चाकी ट्रक फसल्याने या मार्गावरील ट्राफिक बराच वेळ पर्यंत जाम झाली होती. पातुर कडे जाणाNया व येणाNया या ट्राफिक जाम मध्ये प्रभात डे-बोर्डिंग सह पातुर वरून अकोल्यात येणाNया काही विद्याथ्र्यांच्या बसेस अडकल्या होत्या. त्यामुळे प्रभात डे बोर्डिंगच्या पहिली ते चौथीच्या विद्याथ्र्यांना सुट्टी द्यावी लागली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दूर्लक्ष, महापालिका बांधकाम विभागाचे अस्तित्व नसणे यामुळे हा सर्व प्रकार झाल्याचे चित्र होते. आपत्तीत कुठलिही यंत्रणा काम करत नसल्याचे चित्र यावरुन दिसून येत होते.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक रस्ते खचले आहेत. बNयाच ठिकाणी चिखल निर्माण होऊन वाहने फसत आहेत तर कुठे घसरून पडत आहेत. शनिवारी सकाळी सुद्धा अशीच एक घटना पातुर मार्गावरील हायवेच्या अंडरपास जवळ घडली. सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास या अंडरपास जवळ एक मोठा १२ चाकी ट्रक चिखलात फसला होता. त्यामुळे अंडर पास मधून जाणारी व येणारी दोन्ही बाजूची वाहतूक जाम झाली. अंडरपासच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. प्रवासी वाहनांसह मालवाहू वाहने सुद्धा जवळपास तीन तास अडकली होती. यामध्ये पातुर मार्गावर असलेल्या प्रभात डे-बोर्डिंगच्या स्कूल बसेस सुद्धा अडकल्याने ह्या बसेस विद्याथ्र्यांना घेण्यासाठी शहरात पोहोचू शकल्या नाहीत. परिणामी प्रभात डे-बोर्डिंगच्या पहिली ते चौथीच्या विद्याथ्र्यांना सुट्टी द्यावी लागली. काही वेळाने या अंडरपास जवळ निर्माण झालेल्या चिखलात मुरूम टाकून बाजूने तात्पुरता पर्यायी मार्ग काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या मार्गाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी अंडरपास जवळील धोकादायक मार्ग मजबूत करणे आवश्यक होते. परंतु अकोला जिल्ह्यातील रस्ते निर्माण कार्यावर कुणाचेही नियंत्रण नाही, कुणाचाही वचक नाही. कंत्राटदारांनी अगदी मनमानी पद्धतीने त्यांना वाटेल तसे काम करावे आणि नागरिकांना जेवढा देता येईल तेवढा त्रास द्यावा, ही रस्ते निर्माणाची परंपरा गेल्या आठ-दहा वर्षांपासून अकोला जिल्ह्यात सुरू आहे. यावर अकोल्यातील नेते ही काही बोलत नाहीत आणि लोकही काही बोलत नाहीत. प्रशासनाला तर काही घेणेदेणेच नाही. आज फक्त एक ट्रक फसल्याने या मार्गावर एवढी मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली. भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण राहील? असा संतप्त प्रश्न आता नागरिक व विद्याथ्र्यांचे पालक विचारायला लागले आहेत.
उड्डाणपुलाचे श्रेय घेणारे नेताजी गेले कुठे
शहरातील उड्डाण पुलाचे श्रेय घेऊन स्वतःचा उदो उदो करणारे नेताजींना ज्या महामार्गासाठी हा उड्डाणपूल बांधण्यात आला, त्या महामार्गाच्या अत्यंत दयनीय परिस्थितीकडे लक्ष देण्यासाठी वेळ का नसावा असे प्रश्नही उपस्थित व्हायला लागले आहेत. नागरीकांचे हाल होत असताना शासकीय यंत्रणेचे दूर्लक्ष का असा मुद्दा उपस्थित होत असून लोकांची मोठी अडचण होत आहे.