मध्य प्रदेशात ‘आप’ला महापौरपद

देश – विदेश


मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने एक महापौरपद जिंकले आहे.
भोपाळ : मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने एक महापौरपद जिंकले आहे. राज्यातील ११ पैकी सहा ठिकाणी भाजपने महापौरपद जिंकले आहे. तर काँग्रेसला तीन ठिकाणी विजय मिळवला आहे. सिंगरौली येथील महापौरपदी आम आदमी पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे.

भाजपला इंदूर, बुऱ्हाणपूर, सतना, खंडवा, सागर तसेच उज्जैन येथे महापौरपदे जिंकता आली. काँग्रेसला ग्वाल्हेर, जबलपूर तसेच छिंदवाडा येथे महापौरपदी विजय मिळवता आला.
छिंदवाडा हा कमलनाथ यांचा बालेकिल्ला तेथे काँग्रेसने आपला प्रभाव राखला. ग्वाल्हेरमध्ये मात्र भाजपला धक्का बसला आहे. गेल्या वेळी काँग्रेसला एकही महापौरपद जिंकला आले नव्हते. त्यातुलनेत त्यांची कामगिरी चांगली झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *