अकोला पोलीस स्टेशन वर लागले भोंगे

अकोला

अकोला – आगामी काळात येणाऱ्या सण- उत्सव पाहता तसेच पोलिस स्टेशन समोर जमणाऱ्या संतप्त जमावाची माहिती देण्यासाठी शहरातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये लाऊडस्पिकर लावण्यात आले आहेत.त्यामुळे पोलिसांचे काम सोपे होऊ शकते

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात लाऊडस्पीकरचा विषय चांगलाच तापला होता.लाऊडस्पीकर, हनुमान चालीसा या विषयांवर राज्याचे राजकारण सुरू होते. पण हा विषय आता थंड पडला आहे मात्र शहरातील सर्वच पोलिस स्टेशनमध्ये अचानक लावलेले लाऊडस्पिकर पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. धार्मिक उत्सवांची आगामी मालिका लक्षात घेता आणि काही अनुचित प्रकार घडल्यास पोलीस स्टेशनच्या आवारात जमणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या लाउड्स्पिकरचा वापर करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. जेव्हा जमाव चिडतो आणि पोलिस ठाण्यासमोर गर्दी होते. तेव्हा गोंगाटामुळे पोलिसांना माहिती देणे अवघड होते. अशावेळी या लाऊडस्पीकरद्वारे गर्दी करून जमलेल्यांना माहिती देणे पोलिसांचे काम सोपे होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *