गॅस सुरू करतांना सावधान!

अकोला


स्वयंपाक सुरू असतांना गॅसने घेतला पेट
मनपा विभाग प्रमुखांच्या निवासस्थानी घडली घटना

गॅस सिलेंडर मुळे किचन मध्ये आग लागण्याच्या घटना अनेक वेळा आपण ऐकल्यात. अशीच एक घटना घडली अकोला शहरातील सिंधी कॅम्प परिसरात. अकोला महानगर पालिका मध्ये विभाग प्रमुख पदी कार्यरत असलेले राजनकर हे अकोला शहरातील सिंधी कॅम्प रोड वरील अधिकारी निवास स्थानी राहतात.

शुक्रवार 22 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या घरी असलेल्या किचन मध्ये अचानक आग लागली, राजनकर यांच्या घरी स्वयंपाक सुरू असतांना गॅस शेगडीला लावलेल्या नळी मधून गॅस निघत होता. परंतु ही बाब कोणाच्याही लक्षात न आल्याने सिलेंडरने अचानक पेट घेतला. दरम्यान संपूर्ण घरात एकच धावपळ उडाली, आजू बाजूला राहत असलेल्या इतर अधिकाऱ्यांनी तात्काळ निवास स्थान खाली केले, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाडीने घटना स्थळ गाठीत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला परंतु सिलेंडर चा भडका खूप मोठा असल्याने अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अथक परिश्रम करीत आग विझवावी लागली, आग लागल्याची घटना माहिती होताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटना स्थळी एकच गर्दी केली होती. अग्निशमन दल घटनास्थळी लवकर पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली. तरीही नागरिकांनी, गृहिणींनी स्वयंपाक करण्या अगोदर किंवा गॅस सुरू करण्या अगोदर एकदा सावधानतेने तपासून घ्यावे असे आवाहन आर आर सी न्यूज कडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *