20 तास नदीत ताक्तकळत होत्या आजीबाई
तरुणांच्या मदतीने वाचला आजीबाईंचा जीव
पूर्णा नदीकाठावर असलेल्या ऋण मोचन ता.भातकुली येथील श्री. मुद्गलेश्वर मंदिराच्या घाटावर आपतापा ता.जि. अकोला येथील राणे नामक आजीबाई दर्शनासाठी आल्या होत्या परंतु अचानक पाय घसरल्याने त्या नदीत दूरवर वाहून गेल्या होत्या. परंतु दैव बलवत्तर म्हणून आजीबाईंना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
पूर्णा नदीकाठावर असलेल्या ऋण मोचन ता.भातकुली येथील श्री. मुद्गलेश्वर मंदिराच्या घाटावर आपतापा ता.जि. अकोला येथील राणे नामक आजीबाई दर्शनासाठी आल्या होत्या, अचानकपणे त्यांचा तोल जाऊन येथे असलेल्या नदी पात्रात त्या पडल्या. पूर्णा नदी दुथडी भरून वाहत असल्याने त्या दूरवर वाहून जात होत्या. ते पाहून संत गाडगे महाराज मंदिरावर उपस्थित असलेल्या एका युवकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना वाचवू शकला नाही. रात्री बरेच वेळ पर्यंत त्यांचा शोध घेणे चालू होते. तर शनिवारी सकाळी एन्डली (ता.मूर्तिजापूर) येथील नदीत गावातील एक युवक बकऱ्या घेऊन गेला असता त्याला आजीचा आवाज ऐकू आला त्यानंतर एन्डली येथील युवकांनी पाण्यात उड्या घेऊन त्यांना बाहेर काढले काळ आला पण वेळ मात्र आली नाही असेच म्हणता येईल. नदीच्या मध्यभागी 20 तास सलग अडकून पडलेल्या आजींना बाहेर काढून एन्डलीच्या युवकांनी वेगळाच आदर्श प्रस्थापित केला आहे. समाजातून या युवकांचे कौतुक केल्या जात आहे. यामध्ये एन्डली येथील सुरेश बावणेर, ज्ञानेश्वर वानखडे, निवृत्ती वानखडे, गणेश कुरवाडे आदी युवकांचे सहकार्य लाभले.