वंचित आघाडीच्या जेष्ठ पदाधिकार्यांनी केली पुलाची आणि रस्त्याची पाहणी.

अकोला

मोरझाडी :- वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. डॉ. धैर्यवर्धन फुंडकर सर, अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोदजी देंडवे, जि.प. सदस्य पती गजानन भाऊ दांदळे व अविनाश भाऊ खंडारे यांनी उरळ बु ते उरळ खूर्द या दोन गावांमधील पुलाची व झुरळ खूर्द जाणाऱ्या रस्त्याची पाहणी केली. गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून सतत चालू असणाऱ्या पावसामुळे फुलावरून जवळपास दुथडी भरून पाणी वाहत होते व झुरळ खुर्द जाणाऱ्या रस्त्याने चिखलात टोंगळाभर जास्त पाय फसत होते. त्यामुळे दोन्ही गावांवर बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. अशावेळी वंचित बहुजन आघाडी या दोन्ही गावांच्या समस्या तातडीने सोडवणार असे आश्वासन वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. डॉ. धैर्यवर्धन फुंडकर सर यांनी दिले. यावेळी प्रामुख्याने झुरळ खुर्द चे सरपंच पती गौतम घ्यारे, उरळ बु चे सरपंच मंचितराव पोहरे, युवक आघाडीचे ता.अध्यक्ष संदीप वानखडे, भारत वानखडे, बाळुभाऊ वानखडे, दिपक वानखडे, देवराव वानखडे, मंगेश बाभुळकर, चंद्रकांत पाटील, बंडुभाऊ माळी, मन्साराम मेटांगे, अजय मेटांगे, नितेश पोहरे व कपिल वानखडे उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *