महापालिकेला कधी येणार जाग?

Uncategorized

रस्त्यांत खड्डे कि खड्ड्यात रस्ता
छोटी उमरी ते मोठी उमरी रस्त्याचे दृश्य

अकोला : पावसाळा सुरु झाल्यानंतर गेल्या महिनाभरापासून अकोल्यातील काही रस्त्यांच्या अक्षरशः चाळण्या झाल्या आहेत. शहरातील छोटी उमरी ते मोठी उमरी पर्यंतच्या मार्गावर सुद्धा हेच चित्र पाहायला मिळत आहे. परंतु महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

यावर्षी पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने अकोला महानगर पालिकेच्या गेल्या १० वर्षातील विकास कामांचा दर्जा चव्हाट्यावर आणला असून अनेक अंतर्गत रस्त्यांवर वर्ष दोन वर्षात खड्डे पडले आहेत. आणि या रस्त्यांच्या चाळण्या झालेल्या आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालविताना रस्त्यावरील पाण्याच्या खाली खड्डा आहे कि नाही हे ओळखता येत नाही. परिणामी अनेक दुचाकी चालकांचे अपघात घडतात. माजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना या शहराशी आणि नागरिकांशी काहीहि देणे घेणे नाही का असा प्रश्न नागरिक विचारायला लागले आहेत. अशा परिस्थितीतही नागरिकांच्या प्रचंड मनस्तापाकडे माजी नगरसेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना लक्ष द्यायला वेळ नसेल तर लवकरच येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी या सर्व परिस्थितीचा जाब विचारला जाईल असा संताप अकोलकर बोलून दाखवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *