- जिल्हाधिकारी अकोला यांनी २७ जुलै पर्यत दंडाची रक्कम भरणा न झाल्यास दिले कार्यवाही चे आदेश
बोरगाव मंजू :- रस्ता कामासाठी अवैधरित्या वाहतुक केलेल्या गौणखनीजाची दंडाची ४ लाख ६० हजार रूपयांची रक्कम बोरगाव मंजू ग्रामपंचायतच्या तत्कालीन ग्रामसेवकाकडून व ग्रामपंचायत कडून वसुली करून गुन्हे दाखल करण्यात यावी, अशी मागणी दिनेश मोरे यांनी जिल्हाधिकारी अकोला,उपविभागीय अधिकारी, व तहसीलदार अकोला यांच्याकडे केली होती. या कार्यकाळात संदीप गवई हे ग्रामसेवक असल्याने त्यांच्याकडूनच ही रक्कम वसुल करावी, असे तक्रारकत्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी तहसीलदारांकडे सादर करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , महात्मा गांधी रो.ह. योजनेच्या शेत रस्त्यावर सिंचन विहिरीवरुन अवैधरित्या वाहतुक केलेल्या गौण खनीज (मुरुम) या बाबत तहसीलदारांकउून आदेश क्र. रा.मा.क्र. एमएचएल३७ बोरगाव मंजू/०९/२०१४-१५ दि. २८/५/२०१५ अन्वये दंड रु. ४,६०,००० रु. चार लाख साठ हजार रुपये फक्त चा दंड ग्रामपंचायत बोरगाव मंजू यांना करण्यात आला आहे. तो दंड त्यांनी त्या शेतरस्त्याचे काम केले त्या सचिवाकडून वसुल करण्याबाबत वरिल संदर्भीत पत्रान्वये विनंती केली आहे. वरिल रकमेची वसुली ग्रामपंचायतकडून केल्यास ती शासकीय निधीतूनच भरल्या जाईल व जनतेच्या विकास कामाचाच पैसा खर्ची पडेल. तेव्हा वरिल दंडाची रक्कम चुकीचे काम करणारे व विना परवानगीने मटेरियल रस्त्यावर टाकवयास लावणायांकडूनच वसुल करण्याची कारवाई करावी अशी मागणी दिनू मोरे तक्रारकत्याने जिल्हाधिकारी अकोला उपविभागीय अधिकारी अकोला तसेच तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
असे होते मुरूम चोरी व दंडाचे प्रकरण –
मंडळ अधिकारी मौजे बोरगाव मंजू यांनी तहसील कार्यालयात सादर केलेल्या अहवालानुसार मौजे बोरगाव येथील जुना अकोला रस्ता हा एमआरईजीएस अंतर्गत घेण्यात आला असून त्या रस्त्यावर १६/४/२०१५ रोजी ५० ब्रास मुरुम टाकण्यात आला आहे. त्या बाबत महसुल विभागाची परवानगी घेतली नाही. त्यामुळे ५० ब्रास मुरुमाची रॉयलटी दंडासहित भरुन घेण्याबाबत अहवालीत केले आहे.
या प्रकरणात ५० ब्रास अवैध गौण खनिज (मुरुम) वाहतुकीसाठी ग्रामपंचायत मौजे बोरगाव मंजू यांच्याकडून दंडाची वसुली का करण्यात येवू नये याबाबत खुलासा मागविण्यात आला. ग्रामपंचायत बोरगाव मंजू यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा खुलासा अथवा उत्तर प्राप्त झाले नाही. २७.४.२०१५ रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती अकोला यांनी कार्यालयात सादर केलेल्या पत्राच्या अनुषंगाने ग्रामपंचायत बोरगाव मंजू येथे म.ग्रा.रो.ही योजने अंतर्गत एकुन ७ शेतरस्त्याची कामे अपूर्ण आहेत.
ती कामे तातडीने पूर्ण करणेस्तवर बोरगाव मंजू क्षेत्रातील वेय सिंचन विहिरीवर असलेला मुरुम व डब्बर उचलून ती वाहतूक करु त्या शेत रस्त्यांवर टाकण्याची ग्रा.पं. बोरगाव मंजूला परवानगी देणेबाबतचा अर्ज प्राप्त झाला आहे. या याकरिता लागणारया रॉयल्टीचा भरणा ग्रा.पं.ला प्राप्त होणारया म.ग्रा.रो.ह.या. च्या अंतिम देयकावरुन ग्रा.पं. बोरगाव मंजू मार्पत करण्यात येईल असे नमूद केले आहे. सबब चौकशी अंती असे निर्देशनास येते की, मौजे बोरगाव मंजू ता.जि.अकोला येथील जुना अकोला रस्ता हा एमआरईजीएस अंतर्गत घेण्यात आला असून या रस्त्यावर १६/४/२०१५ रोजी ५० ब्रास मुुरूम टाकण्यात आला आहे. त्या करिता महसूल विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही. वरील सर्व बाबी पाहता मी तहसीलदार अकोला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) अन्वये आदेश पारित करतो की, गैरअर्जदार संदीप गवई ग्रामपंचायत बोरगाव मंजू यांनी अवैधरित्या वाहतुक केलेल्या गौणखनिज (मुरुम) दंडाची प्रति ब्रास विंमत रुपये ९२०० प्रमाणे एकुण ५० ब्रासचे ४,६०,००० रु. अक्षरी (चार लाख साठ हजार रुपये) ग्रामपंचायत बोरगाव मंजू यांच्यावर आकारणी करण्यात येत आहे. सदर दंडाची रक्कम गैरअर्जदार ग्रामपंचायत मौजे बोरगाव मंजू यांनी त्वरीत भरणा करावी, असेही आदेशात नमुद केले होते. परंतू अद्यापही या प्रकरणी दंडाची रक्कम गैरअर्जदाराकडून वसुल करण्यात आली नाही. हा सर्व प्रकार जिल्हा परिष सदस्य पती तत्कालीन ग्रामसेवक संदीप गवई यांच्या कार्यकाळतला आहे, हे विशेष. यांच्या वर गुन्हे दाखल करून तात्काळ वसुली करण्यात यावी असे तक्रार कर्त्यानि तक्रार दिली होती परंतु सदर प्रकरणाचे गाभीर्य लक्षात घेता मा.जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी तात्काळ चॉकशी करून २७ जुलै पर्यत ४६०००० रुपये ग्रामपंचायत तसेच तत्कालीन ग्रामसेवक संदिप रामदास गवई यांनी तात्काळ चलनने भरणा करण्याचे व कार्यवाही चे आदेशीत केले आहे.