नवी दिल्ली : देशाच्या 15 व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडला भारताचे सर न्यायाधीश त्यांनी द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा पराभव करत द्रौपदी मुर्मू विजय झाल्या होत्या द्रौपदी मुर्मू ह्या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहे द्रौपदी मुर्मू मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सोबत संसद भवनात दाखल झाल्या होत्या त्यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथविधी पार पडला द्रौपदी मुर्मू ओडिशा प्रदेशातील आदिवासी नेत्या आहेत ओडिशातील बीजेपी सरकार मध्ये 2002 ते 2004 या काळात ह्या मंत्री होत्या त्यांनी झारखंडच्या नव्या राज्यपाल म्हणून देखील काम केले आहे या ओडिशाच्या आहे रायरंगपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणतीही व्यक्ती राष्ट्रपती बनली नाही महिला दलित मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावा अशी मागणी केली जात होती आता द्रौपदी मुर्मू यांच्या माध्यमातून ही गोष्टपूर्ण झाली आहे.