आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम घोषीत
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक
आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम काय आहे

सर्वोच्च न्यायालयाच्या दि. 22 जुलै 2022 रोजीचे आदेश व राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जानेवारी 21 ते डिसेंबर 22 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, दि.29 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमातील निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या, नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम घोषीत झाला आहे, अशी माहिती ग्रा.पं.,जि.प.,पं.स. निवडणुक प्रभारी अधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.
- मंगळवार दि. 26 जुलै 2022 रोजी विशेष ग्रामसभेची सूचना देणे.
- शुक्रवार दि. 29 जुलैपर्यंत विशेष ग्रामसभा बोलवून तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेवर नागरिकांचा मागासवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांची आरक्षण सोडत काढणे.
- सोमवार दि. 1 ऑगस्ट रोजी सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करणे.
- सोमवार दि. 1 ते 3 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करणे.
- बुधवार दि. 10 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अभिप्राय देणे.
- शुक्रवार दि. 12 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस (नमुना-अ) जिल्हाधिकारी यांची मान्यता देणे.
- बुधवार दि. 17 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला(नमुना अ) व्यापक प्रसिद्धी देणे.