कावड यात्रेकरूंना विशेष सुविधा दिल्याबद्दल एआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. कावड यात्रेकरूंवर फुलांचा वर्षाव होत असेल, तर अधिकाऱ्यांनी किमान मुस्लीमांच्या घरावर बुलडोजर चालवू नये, असे त्यांनी म्हटले. तसेच एका धर्माचा द्वेष आणि दुसऱ्यावर प्रेम का? असा प्रश्नही त्यांनी उत्तरप्रदेश सरकारला विचारला आहे.
कावड यात्रेकरूंना विशेष सुविधा दिल्याबद्दल एआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. ”पोलिसांनी कावड यात्रेकरूंवर फुलांचा वर्षाव केला. अधिकाऱ्यांनी झेंडे घेऊन त्यांचे स्वागत केले. अनेक जखमी यात्रेकरूंची सेवा करण्यात आली. त्यांच्या रस्त्यात येणाऱ्या लोहारांना हटवण्यात आले. तसेच त्यांच्या मार्गावर मांस विकण्याचीही बंदीही घालण्यात आली, ही रेवडी संस्कृती नाही का?”, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
”एखाद्या मुस्लीम व्यक्तीने मोकळ्या जागेत काही मिनिटांसाठीही नमाज पठण केले, तर तिथे ‘धडपड’ होते. मुस्लीमांना केवळ मुस्लीम असल्यामुळे पोलिसांच्या लाठ्या ख्यावा लागतात. त्यांना लिंचिंगचा सामना करावा लागतो. बुलडोझरने त्यांच्या घरांची तोडफोड केल्या जाते”, असेही ते म्हणाले.
”कावड यात्रेकरूंच्या भावना एवढ्या तीव्र आहेत की, त्यांना मुस्लीम पोलीस अधिकाऱ्यांचे नाव ही सहन होत नाही. हा भेद का? एका धर्माचा द्वेष आणि दुसऱ्यावर धर्मावर प्रेम का? एका धर्मासाठी वाहतूक अडवल्या जाते, मात्र, दुसऱ्या धर्मावर बुलडोजर का चालवला जातो?”, असेही म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच लखनऊमधील लुलू मॉलमध्ये नमाज पठण केल्यामुळे काही मुस्लीम नागरिकांवर कारवाई करण्यात आली होती. तर गोरखपूरमध्ये सरकारी अधिकाऱ्याच्या घरासमोर एका वृद्ध व्यक्तीला नमाज पठण केल्यामुळे पकडण्यात आले होते. यावरून ओवैसी यांनी उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरले आहे.