देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एचसीएल टेक्नॉलॉजी या कंपनीचे सीईओ सी. विजयकुमार हे सर्वांनाच माहिती आहेत. देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी असलेली ही एचसीएल कंपनी कमाईमध्येही अव्वल आहे. अशा कंपनीत सीईओ पदी असलेल्या सी. विजयकुमार यांचा पगार किती आहे माहितेय का? विजयकुमार हे सध्या सर्वाधिक पगार घेणारे भारतीय सीईओ आहेत.
एचसीएल टेकने नुकताच वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, एचसीएल टेकचे सीईओ सी. विजयकुमार यांना गेल्या वर्षी १२३.१३ कोटी रुपये इतका पगार देण्यात आलाय. कंपनीने स्पष्ट केले आहे की दीर्घकालीन फायद्यांसाठी त्यात त्यांच्या उत्पन्नाच्या तीन चतुर्थांश भागाचाही समावेश आहे. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, विजयकुमार यांना वार्षिक २ मिलियन डॉलर (सुमारे १५ कोटी रुपये) मूळ वेतन मिळते. याशिवाय त्यांना दुसऱ्या पगारात २ दशलक्ष डॉलर्स मिळतात. ३१ मार्च रोजी संपलेल्या वर्षासाठी, त्यांना $०.०२ दशलक्ष रक्कम देण्यात आली. HCL ने सांगितले की $१२.५० दशलक्ष LTI मुळे त्यांचा एकूण पगार $१६.५२ दशलक्षच्या वर केला आहे.