बदलून गेलेल्या व रुजू झालेल्या ग्रामसेवकांचा सत्कार

अकोला

बार्शीटाकळी  : बार्शीटाकळी तालुक्यातील ग्रामसेवक राजेश बंड यांची पाटखेड गावातून बदली झाली त्यांचे जागेवर ग्रामसेवक आर के खिल्लारे हे रुजू झाले त्यांचा सत्कार पाटखेड येथील नागरिकांनी केला आहे, तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये सरपंच महादेवराव मानकर यांचे अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक आर के खिल्लारे यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हर घर तिरंगा हा उपक्रम जल जीवन अनुसूचित जमातीचे विकास कामाचा आराखडा कोविड लसीकरण आदीबाबत चर्चा करण्यात आली यावेळी उपसरपंच वसंतराव वनारे ग्रामपंचायत सदस्य रूखमाबाई मानकर पुष्पलता नेवाल रजनी हागे ग्रामपंचायत कर्मचारी राजेश मते विशाल महाजन मनोहर फाळके ऑपरेटर अर्चना पिंपळकर संजय खरप बाळू लोथे मुरलीधर टेकाळे तुकाराम भालतिडक उपस्थित होते यावेळी सरपंच व सदस्यांनी गावातून बदलून गेलेले ग्रामसेवक राजेश बड यांचा शाल श्रीफळ व हार घालून सत्कार करण्यात आला,यानंतर मनोहर फाळके यांनी त्यांचे घरी बदलून गेलेले ग्रामसेवक राजेश बंड व नव्याने रुजू झालेले ग्रामसेवक आर के खिल्लारे यांचा शाल श्रीफळ व हार घालून सत्कार करण्यात आला यावेळी गजानन फाळके गणेश भटकर विश्वजीत खंडारे हे उपस्थित होते,गावातून बदलून गेलेले व नव्याने रुजू झालेल्या ग्रामसेवकांचा सत्कार चर्चेचा विषय ठरला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *