सनी देओल उपचारासाठी अमेरिकेमध्ये दाखल….

Entertainment

अभिनेता सनी देओल बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. वयाच्या ६५व्या वर्षी देखील तो तितकाच मेहनतीने काम करताना दिसतो. चित्रपटांमधील आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी सनी हवी ती मेहनत घ्यायला तयार असतो. त्याची मेहनत चित्रपटांमध्ये दिसून येतेच. बऱ्याच कलाकारांना चित्रीकरणादरम्यान दुखापत होते. सनीचं देखील आता असंच काहीसं झालं आहे. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सनीला दुखापत झाली आहे.काही आठवड्यांपूर्वी आपल्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना सनीला दुखाप झाली. पण ही दुखापत त्याला महागात पडली आहे. याच्या उपचारासाठी सनी अमेरिकेला रवाना झाला आहे. सनीच्या पाठीला दुखापत झाल्यानंतर मुंबईमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. दुखापत झाल्यामुळे सनी भारतीय राष्ट्रपती निवडणुकीमध्ये सहभागी होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *