चिठ्ठ्याटाकून काढले आरक्षण
राजकीय नेत्यांचे भविष्य टांगणीला
महिलांची सदस्य संख्या अधिक

आकोट पालीकेचे २७ टक्के ओबीसी आरक्षण घोषीत करण्यात आले. तर ९ जागांपैकी ५ जागा महिलांकरिता. ३५ सदस्यीय पालीकेत १८ महिला तर १७ पुरुष उमेदवार विजयी होतील. महिलांची सदस्य संख्या ही अधिक राहणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचा ईम्पिरीकल डाटा मंजूर केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे सूचनेनुसार आकोट पालीका निवडणूकीचे पाश्र्वभूमीवर ओबीसी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. एकूण ३५ सदस्यीय पालीकेत २७ टक्के म्हणजे ९ जागा ओबीसींकरिता आरक्षित करण्यात आल्या असुन त्यातील ५ जागा महिलाकरिता राखण्यात आल्या आहेत. ह्या आरक्षणामूळे पालीकेमध्ये १८ महिला तर १७ पूरुष नगरसेवक राहणार आहेत. आकोट पालीकेत एकूण ३५ सदस्य राहणार आहेत. त्यात सर्वसाधारण गटात ११, सर्वसाधारण महिला गटात १०, नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) गटात ४, नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला गटात ५, अनुसुचीत जाती गटात २, अनुसुचित जाती महिला गटात २, तर अनुसुचित जमाती महिला गटात १ असे बलाबल राहणार आहे. प्रभाग क्र. १, २, ३ ,४, ६, ७, ८, ११, १२, १३, १५ हे प्रभाग सर्वसाधारण गटाकरिता आहेत. प्रभाग क्र. १, ३, ५, ७, ९, १०,.११, १४, १६, १७ हे प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी असतील. प्रभाग क्र, ५, १०, १४, १७ हे प्रभाग नामाप्रसाठी आरक्षित आहेत. प्रभाग क्र. २, ७, ८, १२, १३ हे प्रभाग नामाप्र महिलांकरिता ठेवले आहेत. या पूर्वीच काढलेल्या आरक्षणानुसार प्रभाग क्र. ९, १६ हे अनुसुचित जाती तर प्रभाग क्र. ४, १५ हे प्रभाग अनुसुचित महिलांसाठी राखण्यात आले आहेत. क्र. ६ हा अनुसुचित जमाती महिलेकरीता आरक्षित केला गेला आहे.