महिन्याभरानंतरही खातेवाटप नाही

Maharashtra State

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाला शनिवारी एक महिना पूर्ण होत असला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही झालेला नाही. परिणामी मुख्यमंत्री आणि बिनखात्याचे उपमुख्यमंत्री असाच कारभार सध्या सुरू आहे. तेलंगणात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली दोनच मंत्र्यांचे सरकार ६६ दिवस कार्यरत होते. शिंदे हा विक्रम मोडतात का, याचीच उत्सुकता असेल. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे साचेबद्ध उत्तर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने दिले जाते. पण विस्ताराला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी ३ ऑगस्टला शपथविधी होईल, अशी तारीखच जाहीर केली. पण अद्याप तरी विस्ताराबाबत अधिकृतपणे घोषणा झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *