जनता आंदोलनाच्या मार्गावर
बार्शीटाकळी : बार्शीटाकळी निवडणुकीच्या वेळेस जनतेला मते मिळविण्यासाठी गल्लीपासून दिल्ली पर्यंतच्या विकासात्मक कामे करीन अशा प्रकारचा डांगोरा पिटणाऱ्या विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधीला या रस्त्यावर अनेक जीव घेणे अपघात झाले तरीही रस्ता दुरुस्ती करिता निधी मिळविता येत नाही व दुरुस्तीचे काम करता येत नसल्याने या रस्त्याने ये जा करणाऱ्या सोनगिरी पाटखेड चिंचोली राजनखेड वागझळी वरखेड शेलगाव बोरमळी या गावातील जनता कमालीची संतप्त झाली आहे. बार्शीटाकळी ते पाटखेड हा सात सात किलोमीटर अंतराचा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत खासदार संजय धोत्रे यांच्या प्रयत्नामुळे झाला होता हा रस्ता झाल्यानंतर जिल्हा परिषद अकोला यांना हस्तांतरित करण्यात आला या रस्त्यावर गतवरची वर्षी पावसाळ्याच्या कालावधीत एका मोठ्या ठेकेदाराने पाटखेड ते रुद्रायणी देवी या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत काम केले होते सदर ठेकेदाराच्या ठेकेदाराच्या 25 ते 30 टन जड वाहतुकीच्या बारा चाकी वाहनाने रस्ता सर्वत्र खराब झाला होता याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बच्चुभाऊ कडू यांच्याकडे काही लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या होत्या याबाबत पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषद चे कार्यकारी अभियंता यांना चौकशीचे आदेश दिले होते त्यावेळी अनेकांनी सदर कंत्राटदाराकडून हात मिळविणे केली असल्याची खमंग चर्चा आजही सर्वत्र होत आहेत यावेळी वृत्तपत्रातून सत्यनिष्ठ बातम्या प्रकाशित होतात सदर कंत्राटदाराने नाममात्र स्वरूपात एक-दोन मोठ्या दगडाचा मुरूम टाकून वेळ निभावून नेली होती अनेकांनी सदर कंत्राटदाराकडून खिसे भरून घेतल्याची चर्चा आहे याबाबत कार्यकारी अभियंता यांना माहिती मागितली असता तुम्ही यात लक्षघालू नका असे सांगतात
सदर रस्त्यावर यावर्षी पावसाळ्यात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत ती पाण्याने भरल्याने अनेक अपघात झाले आहेत सदर रस्ता दुरुस्ती करण्याकरिता जिल्हा परिषद अकोला व बार्शीटाकळी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना विसर पडला आहे याबाबत आमदार व खासदाराकडे विचारणा केली असता सदर रस्ता हा जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाला जोपर्यंत हस्तांतरित करू शकत नाही तोपर्यंत सदर रस्ता मंजूर करण्यास अडचण ठरते असे सांगण्यात आले जिल्हा नियोजन समितीच्या सभेत एका बाहेरील आमदारांनी सदर रस्त्याचे नवीन काम करण्याचे प्रयत्न चालविले आहेत अशा प्रकारची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून दिली या भागातील जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्याचा विसर पडला आहे या भागातील अनेक गावातील जनता आंदोलनाच्या मार्गावर आहे