
बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता बऱ्याच काळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. तनुश्री ही हॅशटॅग Metoo प्रकरणामुळे प्रसिद्धीझोतात आली होती. २००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लिज’ या चित्रपटाच्या सेटवर प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी लैंगिक गैरवर्तणूक केल्याचा आरोप तनुश्रीने केला. हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं. आता पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे. तनुश्रीने काही वर्षांनंतर नाना पाटेकर यांच्यावर राग व्यक्त करत इन्स्टाग्रामद्वारे पोस्ट शेअर केली आहे.

तनुश्रीने नाना पाटेकर यांच्याबाबत पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच पुढे तिचं काही झालं तर त्यासाठी नाना पाटेकर जबाबदार असतील असं तनुश्रीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.