उड्डाणपुला खालच्या नव्या वस्त्या चिंतेची बाब

अकोला


महापालिकेच्या दूर्लक्षामुळे सर्व प्रकार उजेडात
सुपरफास्ट च्या बातमीचा दणका अतिक्रमण साफ

उड्डाणपुलाखाली तयार होणारी वस्ती ही सामाजिक चिंतेची बाब झाली आहे. टॉवर चौकातील उड्डाणपुलाखालची वस्ती ही अनेक समस्या निर्माण करणारी असून या विषयी आज आर आर सी नेटवर्वâच्या सिटी न्यूजसुपरफास्ट ने बातमी घेतल्यानंतर लगेच या विरोधात कारवाई करण्यात आली.
शहरातील उड्डाणपुलाखाली अशा प्रकारे अनधिकृत वस्त्या तयार होत असून त्या त्वरीत काढण्याची गरज आहे.शहरातील रस्त्यावर यातील अनेक लहान मुलं हे भिक मागतात,पुâगे विकतात. येथे शाळा बाह्य मुले मोठ्या संख्येत आहे. शहरातील उड्डाणपुलाखाली जाळी लावलेली असताना त्याखाली निर्माण केलेला अनधिकृत रहिवास हा त्वरीत काढण्याची गरज आहे. अतिक्रमणाची नवी समस्या निर्माण होण्यापुर्वी ही उपाय योजना करण्याची गरज आहे. आज अखेर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला जाग आली आणि त्यांनी या भागात अनिधकृतपणे राहणाNया नागरीकांना हुसकावून लावले. त्याच बरोबर त्याचे सामान ही उचलण्यास भाग पडले. या विषयी आज आर आर सी नेटवर्वâच्या सिटी न्यूज सुपरफास्ट मध्ये बातमी प्रकाशित होताच ही कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *