अकोला : अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर नगरीत श्रावणमास आणि कावड यात्रा महाेत्सव दरवर्षी साजरा केला जातो, दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर राजराजेश्वर कम्युनिकेशन समूहामध्ये राजेश्वरोत्सवाला प्रारंभ करण्यात आला..
जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले
गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकाम् ।
डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं
चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम्
अशा भक्तीमय आर्जवाने यंदा दोन वर्षानंतर राजराजेश्वर कम्युनिकेशन समूहामध्ये राजेश्वरोत्सवाला प्रारंभ करण्यात आला, अकोला शहराचे दैवत श्री राजराजेश्वर ला १९४४ मध्ये अकोल्यात दुष्काळ पडल्याने त्या वेळी अकोलेकरांनी गांधीग्रामच्या पूर्णानदीच्या पाण्याने श्री राजराजेश्वराला जलाभिषेक केला
आज या घटनेला तब्बल ७८ वर्ष होत आहेत, तेव्हापासून अकोल्यामध्ये श्रावणमास आणि कावड-पालखी महोत्सवाला सुरुवात झाली. हीच परंपरा आज मोठ्या उत्सवाने अकोलकर दरवर्षी पार पडतात, याच अनुषंगाने आर.आर. सी. तथा सिटी न्युज सुपरफास्ट प्रस्तुत राजेश्वरोत्सवाचे मोठ्या थाटात उद्घाटन रविवारी पार पडले. या कार्यक्रमात राजेश्वर संस्थान विश्वस्त मंडळाचे गिरीश देशपांडे, नरेश लोहिया, ऍड रामेश्वर ठाकरे,गजानन घोंगे, रामनवमी शोभायात्रा समितीचे गोवर्धन शर्मा, सुनील पसरी, बाळकृष्ण बिडवयी, संदीप वाणी, विलास अनासाने, नवीन गुप्ता तसेच जानकी वल्लभ मातृशक्ती च्या सारिका देशमुख, रेखा नालात, पुष्पा वानखडे मीरा वानखडे,शीतल गिरी,शर्मिला गिरी,मनीषा भुसारी,गीता जोशी,दुर्गा जोशी आदी उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षाच्या विश्रांती नंतर या वर्षी श्रावण मास कावड महोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येणार आहे. या राजेश्वरोत्सवाचे उद्घाटन भार्गवी मते यांनी शिव स्तुती नृत्याच्या माध्यमातून करून उपस्थित शिवभक्तांची मने जिंकली राजेश्वरोत्सवास उद्घाटनास आमदार गोवर्धनजी शर्मा, आर आर सी समूहाच्या संचालिका सौ कल्पना देशमुख, आर आर सी समूहाचे कार्यकारी संचालक पंकजजी देशमुख तथा ऋतुजा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.