सण उत्सवांच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांचा रूटमार्च
कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन
आगामी काळातील सण, उत्सव व राष्ट्रीय कार्यक्रम लक्षात घेऊन अकोला शहरात कुठेही अनुचित प्रकार घडता कामा नये शिवाय कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जुने शहर पोलीस स्टेशन व डाबकी रोड पोलीसांच्या वतीने जुने शहरात रूट मार्च काढण्यात आला.
श्रावण महिना, मोहरम, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, कावड यात्रा इत्यादी कार्यक्रमांच्या पाश्र्वभूमीवर अकोला शहरात भांडपुरा चौक, राजेश्वर मंदिर, जय हिंद चौक, अग्रेसर चौक, भीम नगर चौक, मुकुंदवाडी चौक, चहा कारखाना असा रूट मार्च काढण्यात आला. यावेळी डाबकी रोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश खंडारे, जुने शहर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. यांचा रूटमार्चमध्ये सहभाग होता तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल, जुने शहर पोलीस स्टेशनचे व डाबकी रोड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी होते.