शेगाव येथील जुगार अड्यावर पोलिसांचा छापा

बुलढाणा


७ आरोपींसह १४ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त
शेगाव पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकाची कारवाई


शेगावातील बालाजी फैल येथील जुगार अड्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने शुक्रवारी रोजी अचानक छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलीस पथकाने एकूण चौदा हजार नऊशे वीस जप्त करून सातही जुगार खेळणाNयाना रंगे हात पकडून त्यांच्या वर जुगार विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले


बालाजी फैल येथे सात लोक चोरून पत्त्याचा खेळ खेळत असल्याची माहिती शेगाव पोलीस स्टेशन व डीबी पथक शेगाव यांना मिळाली असता पीएसआय इंगोले यांच्या नेतृत्वात शेगाव येथील पथकाने बालाजी फैल येथील जुगार अड्यावर धाड टाकली असता तेथे अशोक जानकर, रवींद्र साळुंके,धर्मराज देवकते, सुभाषराव डांबे, गणेश धागे, किशोर कदम, पंजाब पल्हाडे हे पत्ता खेळताना आढळून आले,पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले पोलीस पथकाने त्यांच्याजवळुन १४ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत जुगार विरोधी कायदे अंतर्गत कारवाई केली, शहरांमध्ये अनेक ठिकाणी अशाच प्रकारे काही घरांमध्ये चोरुन जुगार आणि वरली चा गेम सुरू आहे परंतु त्यांच्या विरुद्ध पक्क्या माहितीच्या अभावी ते वाचत आहेत , अश्या लोकांवर सुद्धा आमची करडी नजर आहे .असे पोलिस प्रशासनने सांगितले पुढील तपास पीएसआय इंगोले आणि पथक करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *