“तू कोणी सेलिब्रिटी नाही…”, सोशल मीडियावर स्वरा भास्कर ट्रोल

Entertainment

बॉलिवूड सिनेमांबरोबरच सोशल मीडियावरही कायम सक्रिय आणि चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. बॉलिवूडमधील घराणेशाही असो, राजकिय किंवा सामाजिक तसचं महिलांवरील मुद्दे असो स्वरा सोशल मीडियावर नेहमीच तिचं मत परखडपणे मांडत असते. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे तिला बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. मात्र ट्रोलर्सची बोलती बंद करणं स्वराला चांगलच ठाऊक आहे.

नुकतच स्वराला तिच्या एका ट्वीटवरून काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय. या ट्रोलर्सना स्वराने आता उत्तर दिलं आहे. ‘चित्रपटगृहांमध्ये सिनेमा सुपरहिट ठरण्याची वाट पाहत आहे’ असं ट्वीट स्वराने केलं होतं. यावर नेटकऱ्यांनी काही कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. एक युजर म्हणाला, “तुझं स्वागत आहे. खरचं माझ्या इमारतीत काही दुरुस्तीची काम सुरू आहेत त्यामुळे झोपण्यासाठी शांत जागा मिळत नाहीय. तुझा सिनेमा आहे म्हंटल्यावर थिएटरहून अधिक शांत जागा शोधून साडणार नाही.” असं म्हणत नेटकऱ्याने स्वरावर टीका केली.या टीकाकाराला स्वरानेही उत्तर दिलं आहे. “हा हा! खूप सराव केलेला फालतू विनोद करण्याची तुला संधी मिळाली याचा आनंद आहे. जा आता तुझ्या मित्रांना दाखव की मी तुला रिप्लाय दिलाय.” स्वराच्या या प्रतिक्रियेनंतर पुन्हा या युजरने तिच्यावर निशाणा साधला आहे. “फुशारकी मारण्यासाठी तू कोणी सेलिब्रिटी नाही आणि हो मला इतर लोकांसमोर नाचायला आवडत नाही” असं म्हणत या युजरने पुन्हा स्वराला ट्रोल केलं.फिल्म ‘जहां चार यार’ हा स्वरा भास्करचा सिनेमा १६ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात स्वरासह मेहर विज, पूजा चोप्रा, शिखा तलसानिया या अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *