बेटी बचाव बेटी पढाव अभियान अंतर्गत मुलीं साठी स्वसंरक्षणाचे मोफतशिबिराचे आयोजन

अकोला

अकोला : मा. केंद्रीय मंत्री श्री संजूभाऊ धोत्रे, श्री गोवर्धन जी शर्मा , आ. श्री रणधीर भाऊ सावरकर, आ. श्री वसंत खंडेलवाल, महानगर अध्यक्ष श्री विजय भाऊ अग्रवाल यांच्या नेतृत्वात तथा आदरणीय सौ. सुहासिनी धोत्रे, सौ मंजुषाताई सावरकर सौ पुष्पाताई खंडेलवाल , महापौर सौ.अर्चनाताई मसने, सौ अश्विनीताई हातवळणे सौ. सुनिता ताई अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 5.8.2022 रोजी एक दिवशीय बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत महाराष्ट्र कन्या शाळा तसेच जिजाऊ कन्या शाळा या दोन शाळांमध्ये मुलींना स्व संरक्षणाचे मोफत शिबिर ठेवण्यात आले होते. शिबिराचे आयोजन सौ निकिता राहुल देशमुख (पूर्वमंडळ अध्यक्ष भाजपा तसेच बेटी बचाव बेटी पढाव संयोजिका अकोला) यांनी केले होते. आणि शिबिराचे प्रशिक्षण प्रशिक्षिका डॉ. खुशबू चोपडे ( स्वयंसिद्ध संचालिका) यांनी दिले. मुलींना स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले जेणेकरून ते कोणत्याही धोकादायक परिस्थिती स्वतःचे व इतरांचे संरक्षण करू शकतील. या कार्यक्रमा साठी सौ चंदाताई शर्मा सौ गीतांजली काकू शेगोकार , सौ सारिका जैस्वाल, सौ रश्मी कायंदे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ निकिता राहुल देशमुख यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *