प्रधान सचिव मा श्याम तागडे यांनी मांडले विचार
बुद्धांनी मानव जातीला धर्म नव्हे तर धम्म शिकविला
अकोला : प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान चे प्रमुख मा श्याम तागडे यांनी अकोला स्थित डाॅ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय उत्कर्ष प्रतिष्ठान या ठिकाणी बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे बुद्ध धम्म मिशन या विषयावर आपले अफाट विचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी व्याख्यान आयोजीत करून बुद्धांनी मानव जातीला धर्म शिकविला नसून धम्म शिकविल्याचे प्रतिपादन प्रधान सचिव तथा प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान चे प्रमुख मा श्याम तागडे यांनी केले.
आज रविवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये प्रधान सचिव तथा प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान चे प्रमुख मा श्याम तागडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे बुद्ध धम्म मिशन या विषयावर आपले विचार समाजासमोर मांडले या मध्ये त्यांनी बुद्धांनी धर्म शिकविला नसून धम्म शिकविला आहे. डॉ बाबा साहेब आंबेडकरांना एका विशिष्ठ पद्धतीने धम्म निर्माण करून धर्म प्रचारक निर्माण करायचे होते, धर्म हा पुस्तकात असून धम्म आचरणात असावा अशा विविध महत्वपूर्ण घटकांवर त्यांनी प्रकाश टाकला, मानव जातीने बुद्धाच्या धम्माचे पालन करून त्या मार्गावर चालण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो आणि प्रबोधनाचे कार्य देखील करतो असे त्यांनी आर आर सी चॅनल सोबत बोलतांना सांगितले या कार्यक्रमाला केवळ अकोला जिल्यातील नव्हे तर अनेक जिल्यातील उपासकांनी मोठ्याप्रमाणात हजेरी लावली. मुंबई मंत्रालयात प्रधान सचिव पदावर कार्यरत असून धम्म ज्ञानाचे कार्य मा श्याम तागडे करतात. आज च्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. प्रा. मुकुंद भारसाकळे लाभले असून मुख्य अतिथी मध्ये अकोला जिल्ह्याचे निवासी उप जिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, मा जगताप साहेब बी डी ओ अकोला, मा शशिकांत जांभुरणकर मा विनोद विरघट मा राजेंद्र घनबहाद्दूर किशोर तेलगोटे आदींची उपस्थित होती, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना तायडे तर प्रास्ताविक मा. रमेश तायडे यांनी केले. अंततः आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली