जॅपनीज भाषेचे प्रशिक्षण देवून अनेक युवकांना देशविदेशात उच्चशिक्षण व करीयर च्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या प्रसिद्ध *युझेन कन्सलटन्सी सर्व्हिसेस द्वारा शनिवार दि. 06/08/2022 रोजी सम्यक संबोधी सभागृह, रणपिसे नगर, अकोला येथे एक दिवसीय सेमिनार आयोजित आला होता.
या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी प्रा. मुकुंद भारसाकडे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून युझेन कन्सलटन्सी सर्व्हिसेसचे डायरेक्टर मा. महेश खैरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच माजी सहाय्यक आयुक्त मनपा मा. राजेंद्र घनबहाद्दुर व प्रसिद्ध मोटिवेशन स्पीकर डॉ. प्रफुल्ल वानखडे यांन्नी सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सेमिनारमध्ये जॅपनीज भाषेचे वैश्विक महत्त्व, भारतीयांच्या मनात या भाषेबाबत न्यूनगंड का आहे?,या भाषेचे बारकावे, ही भाषा सहजपणे अगदी काही महिन्यांमध्ये कशी शिकता येईल, जॅपनीज भाषा ही तंत्रज्ञानाची भाषा म्हणुन कशी उदयास आली व भारतीय तरुणांनी ही भाषा आत्मसाद केल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या वैश्विक संधी, यासोबतच तरुणांच्या मनातील अनेक प्रश्नांवर सखोल मार्गदर्शन मान्यवरांकडून करण्यात आलें
इच्छूक विद्यार्थ्यांनी जॅपनीज भाषा कोर्स ला प्रवेशासाठी 7972918659 या दूरध्वनी क्रमांकवर संपर्क करावा असे आवाहन युझेनचे जॅपनीज भाषा प्रशिक्षक – सिद्धार्थ राऊत यांनी केले आहे.