लाकूड खाणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

Trending NEWS

आपण आजवर काही रिऍलिटी शो मध्ये लाईटबल्ब, ट्यूबलाईट, बाटल्या खाताना लोकांना पाहिलं असेल. अलीकडेच सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक वृद्ध व्यक्ती लाकडाचा भुसा, चारा खाताना पाहायला मिळत आहे. आता हे ऐकून हा कोणतीतरी अघोरी असावा किंवा मानसिक रुग्ण असावा असे तुम्हाला वाटून गेले असेल पण हा इसम चक्क रस्ते विकास विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी असल्याचे सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्ट नुसार कोल्हुईच्या रुद्रपूर शिवनाथ गावचे रहिवासी बुधिराम हे वर्षभर सामान्य नागरिकांप्रमाणे राहतात पण नागपंचमीच्या दिवशी त्यांच्या अंगात महिषासुराचा आत्मा येत असल्याच्या चर्चा आहेत.महराजगंज जिल्ह्यातील रहिवाशी बुधिराम यांच्या व्हायरल व्हिडीओ मध्ये ते एका देवीच्या मंदिरातील महिषासुराच्या मूर्तीसमोर बसून जनावरांप्रमाणे भुस्सा, चारा खाताना दिसत आहेत. मागील ४०-४५ वर्षांपासून नागपंचमीच्या दिवशी शरीरात महिषासुराचा आत्मा प्रवेश करून अशाच प्रकारे लाकडाचा भुगा व चारा खायची इच्छा करत असल्याचे बुधिराम स्वतः सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *