
समुद्रातील संशोधनासाठी केंद्र सरकारने ‘समुद्रयान’ ही मोहीम सुरू केली आहे. तज्ज्ञांची टीम समुद्रात पाठवून संशोधन करणे हा त्यामागचा उद्देश आहे. या मोहिमेंतर्गत तीन तज्ज्ञांची टीम समुद्रात 6 हजार मीटर खाली पाठवण्यात येईल. यासाठी नुकत्याच तयार करण्यात आलेल्या ‘मत्य ६०००’ ( MATSYA 6000 Deep Submergence Vehicle ) या समुद्रात खोलवर जाऊन खनिजांचा शोध घेणाऱ्या वाहनाचा वापर करण्यात येणार आहे.पृथ्वीचा ७० टक्के भाग पाण्याने महासागराने व्यापला आहे. या महासागरांचा फक्त पाच टक्के भागात आतापर्यंत संशोधन करण्यात आले आहे. ९५ टक्के भाग अद्यापही बाकी आहे. भारत तिन्ही बाजूंनी महासागरांनी वेढलेला आहे आणि देशातील सुमारे 30 टक्के लोकसंख्या किनारी भागात राहते. जेथे लोकांचे मुख्य आर्थिक स्त्रोत मत्स्यपालन आणि मत्स्यपालन, पर्यटन, उपजीविकेचे साधन आहे. भारताला ७५१७ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. ज्यामध्ये नऊ राज्ये आणि १३८२ बेटं आहेत. त्यामुळे भारतासाठी पाण्याखाली शोध घेणं हे महत्त्वाचं आणि फायदेशीर ठरणारं आहे. यामुले अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.

