बार्शीटाकळी : शासनाकडून मिळत असलेला तांदूळ गावागावातून लघु व्यापारी भेभावपणे खरेदी करतात सदर मालाची खरेदी केल्यानंतर बार्शीटाकळी सहा ते सात मोठ्या व्यापाऱ्यांना विकण्यात येतो सदर संकलित झालेल्या मालाची 10 ते 12 चाकी मोठ्या ट्रक मध्ये भरून आंध्र प्रदेश व विविध ठिकाणी महसूल व पोलीस विभागाच्या सहकार्याने विकल्या जातो शासकीय आदेश व नियम धाब्यावर बसून शासनाच्या महत्वकांक्षी योजना खुलेआम गैरवापर वापर व कोट्यावधी रुपयाचा खरेदी-विक्री काळाबाजार चालू आहे.
शासनाकडून बचत गट व सरकारी स्वस्त धान्य दुकानदार अंतर्गत प्रत्येक गावात गहू तांदूळ विविध प्रकारच्या डाळी साखर तेल जनतेला कमी भावात मोफत वितरित करण्यात येत आहे या तालुक्यात गव्हाचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तांदुळांचा वापर करणाऱ्यांची संख्या कमी आहे परंतु धान्य वितरण करताना गव्हापेक्षा तांदुळांचे अधिक वाटप असते त्यामुळे विविध गावातील जनता सदर तांदूळ गावात येणाऱ्या लघु व्यापाऱ्यांना विक्री करत आहे रोज दिवसभर विविध गावातील जनतेकडून 10 ते 13 रुपये पर्यंत सदर तांदुळाची खरेदी करण्यात येते. सदर खरेदी केलेला तांदूळ हा बार्शीटाकळी येथील सहा ते सात वेळा मोठ्या व्यापाऱ्यांना 17 ते 18 रुपये किलो प्रमाणे विकण्यात येतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तांदूळ साठा तयार झाल्यानंतर सदर मालाची दहा ते बारा चाकी ट्रक मधून आंध्र प्रदेश तेलंगणा व महाराष्ट्रातील गोंदिया चंद्रपूर व इतर जिल्ह्यात सदर मालाची विक्री करण्यात येते महिना व वर्षासाठी तांदूळ खरेदी विक्रीवर कोट्यावधी रुपयाची उलाढाल महसूल पोलीस अन्न सुरक्षा विभागातील व भरारी पथकातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी व तांदुळाचा काळाबाजार करणाऱ्या हस्तकाकडून सर्व शासकीय आदेश व नियमांची उल्लंघन करून खुलेआम तांदुळाची तस्करी चालू आहे काही दिवसापूर्वी खडकी भागात अकोला येथील भरारी पथकाने तांदुळाचा मालसाठा जप्त केला होता
सरकारी स्वस्त धान्य दुकानातून विकलेल्या गहू तांदुळाची तस्करी तालुक्यातून इतर ठिकाणी होत आहे याची जाणीव विविध विभागातील व कर्मचारी यांना आहे ते काही आमिषाला बळी पडून अन्नधान्याचा काळाबाजार करणाऱ्यांना बळी पडत आहेत हे सांगण्याला कुण्या संशोधकाची गरज नाही केंद्र शासन व राज्य शासनातील जबाबदार लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी या प्रकाराची सखोल चौकशी केल्यास खूप मोठा काळाबाजार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत जबाबदार अधिकारी यांचे मत विचारले आमचं लक्ष आहे एवढेच सांगतात व ते या विषयावर बोलायला तयार नाहीत त्यामुळे त्यांचं अशा लोकांना बळ मिळते हे उघड सत्य आहे.