ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न अद्याप बिकटच
ग्रामपातळीवर आरोग्य यंत्रणा सलाईनवरच
जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैधकीय अधिकाNयांच्या उपस्थिती वर प्रश्न चिन्ह निर्माण केला होता . प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांचा आरोग्याच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सीईओंनी अचानक पाहणी केल्याने अनेकांचे धाबे दणाणले.
जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्य स्टिंग ऑपरेशन मध्ये जिल्ह्याची परिस्थिती समोर आली आहे. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रावर अधिकारी व कर्मचारी नसल्याने जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा ग्राम पातळीवर कोणाच्या भरवश्यावर आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावर अनुपस्थितिचा मुद्दा सभागृहात पण सदस्य मार्फत गाजत जरी असला तरी ही अनुपस्थिती असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कारवाही ची भूमिका आता पर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाकडून समोर आली नाही . प्राथमिक आरोग्य केंद्राचा हा प्रकार जरी समोर आला असला तरी ही सध्याच्या परिस्थितीत पण ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अधिकारी कर्मचारी हे उपस्थित नसतात . या कडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे .