शेतकNयांना त्वरीत मदत द्यावी ही मागणी
अकोला जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे, रस्ते, बंधारे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अशा शेतकयांना त्यांच्या नुकसान ची भरपाई देण्यात यावी या मागणी साठी आज शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
अकोला जिल्यात गेल्या ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. त्यात विशेष अकोला जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दरम्यान आलेल्या पुरामुळे शेतकNयांच्या पिकांचे, घरांचे, रस्त्यांचर तसेच बंधाNयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या बाबतीत गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नुकसान ग्रस्त शेतकNयांना एन.डी.आर.एफ. च्या दुप्पट हेक्टरी रू.१३,६०० रुपये मदत नुकसान भरपाई म्हणून जाहिर केली आहे व त्याची २ हेक्टर ची मर्यादा ही वाढवून ३ हेक्टरपर्यंत केली आहे. त्या मुळे अकोला जिल्ह्यातील कुठलाही शेतकरी ज्याच्या घराचे, शेतीचे नुकसान झाले असेल असा एकही नुकसान झालेला लाभार्थी वंचित राहता कामा नये. तसेच ज्याही गावातील रस्त्याचे व बंधाNयाचे नुकसान झाले आहे. त्याचेही पाहणी करून त्याला सरसकट तातडीने शासकीय मदत मिळण्यासाठी संबंधित विभागाकडून त्याचे पंचनामे करण्याचे आदेश देवून शासनास अहवाल शासनास सादर करावा. या मागणी साठी आज शिवसेना चे जिल्हा प्रमुख अश्विन नवले तसेच शिवसेना चे इतर पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.