जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचा सहभाग
घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा. यासाठी आज शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
हर घर तिरंगा या अभिनव उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट रोजी झेंडा लावावा. या करिता आज अकोला शहरातून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली, सदर रॅली मध्ये जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्यासह इतर अधिकारी यांनी स्वतः हातामध्ये तिरंगा घेत रॅलीमध्ये सहभाग घेतला. या तिरंगा रॅली ची सुरुवात जिल्हा परिषद मधून करण्यात आली. तसेच ही रॅली अशोक वाटिका, बस स्थानक चौक, खुले नाट्यगृह चौक, गांधी चौक, सिटी कोतवाली, तहसील कार्यालय मार्गे काढण्यात आली, या तिरंगा रॅली चा समारोप पुन्हा जिल्हा परिषद मध्ये करण्यात आला, या रॅली मध्ये जिल्हा परिषद चे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.