खदान परिसरातील अतिक्रमण झाले साफ

अकोला


मोठ्या प्रमाणात झाले होते अतिक्रमण
शहरातील इतर भागातील अतिक्रमणाचे काय


शहरातील खदान भागात आज अतिक्रमण विरोधी पथकाने मोहिम राबविली. या मोहिमेत अनेक दूकाने पुर्णतः तोडण्यात आली. तसेच छोट्या व्यावसायिकांना त्यांच्या दूकानातील वस्तु देखील गोळा करु दिल्या नाहीत.


शहरातील खदान भागात निर्माण झालेले तात्पुरते अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने काढले. सिंधी वॅâम्प परिसरातील अतिक्रमण काढत महापालिकेने कारवाई सुरु केली. त्यामुळे अतिक्रमण करणाNयांचे धाबे दणाणले आहे. सिंधी वॅâम्प परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. सिंधी वॅâम्पमध्ये मोठ्या प्रमाणात पक्के अतिक्रमण देखील असून त्याने देखील रस्ते, नाल्यांवर कब्जा केला आहे. हे अतिक्रमण साफ करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शहरातील सण समारंभाच्या दरम्यान अतिक्रमण मोहिम का राबविण्यात येत आहे अशी विचारणा आता होत आहे. गेल्या एक दोन महिन्यांपासून थंडबस्त्यात असलेली ही मोहिम अचानक का सुरु झाली असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *