प्रहार महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांचा पुढाकार
कारगील युध्दातील साहसी अनुभव कथन
१५ ऑगस्ट स्वतंत्र दिनी जुने शहरातील डाबकि रोड स्थित मास्टर पॉवर जिम च्या वतीने देशभक्तीपर मोटर सायकल तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले.. त्याचे आयोजन व नेतृत्व जीम संचालक तथा प्रहार महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी करण्यात आले.मात्र या वर्षी हा उपक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने सजावट करून भावी पिढीला विशेष संबोधनात्मक संदेशाने या रँलीला महत्व आले.
प्रहार महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनात देशभक्तीपर मोटर सायकल तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रँलीला खंडेलवाल कॉलेज चे प्राचार्य जगदीश साबू यांनी हिरवी झेंडी दाखवून गती दिली.मुख्यता या रँलीत कारगील युद्धातील टँक चालक विशेष साहसी कामगीरी बजावणारे जाँबाज सुभेदार फौजी सुरेंद्र खरात व लहान मुलं-मुलीं तिरंगा फडकवित सांस्कृतिक वेशभुषेत वाहनावर सज्ज झाल्या. साहसी आकर्षनाचा देखावा पाहून प्रेक्षक वर्ग गदगद झाला होता. या रँलित जेष्ठ सुभेदाराच्या मनोबलातून प्रेरणा घेऊन भरपावसाच्या झडीत सुद्धा शेकडो तरुण तरुणी तसेच अपंग क्रांती अध्यक्ष मोहीनअली व बहुसंख्य दिव्यांग बाधवांनीं आपल्या देशभक्ती आणि चिकाटीचा परिचय दिला. या रँली दरम्यान मधनलाल धिंग्रा चौक येथे वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी समवेत त्यांच्या राष्ट्रीय जयघोष करीत स्वातंत्र दिवसाचा केक सुशोभीत केला होता. स्वराज्य भवनात सुभेदार खरात यांच्या सत्कार करतांना त्यानी त्यांच्या कारगील युद्धाचे साहसी अनुभव दोन शब्दाच्या भाषनात सांगीतले असता भरपावसात तरुण तरुणींच्या अंगावर अक्षरशः अंगावर साहसी रोमांच शहाराला गेला. प्रहार महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनात हे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय उत्सव सोहळ्यासाठी अनोखे आयोजन करण्यात आले होते. या करीता मास्टर पॉवर परीवार मित्र मंडळीने अथक प्रयत्न करून हा उत्सव आपले राष्ट्रीय कर्तव्य समजुन यशस्वीपणे शिस्तीत पार पाडला.