
थोर पुरुषांचे वेगवेगळे सजावट, पथनाट्य लेझीम व सजावट रॅलीचे आकर्षण
ग्रामपंचायत भावनावर हर घर तिरंगा 75 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सकाळी फडकवण्यात आला ध्वजारोहण,
स्थानिक ग्रामपंचायत मधील क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन पुष्पहार वाहून तसेच विविध पुढारी नेत्यांचे फोटो पूजन करण्यात आले व ध्वजारोहणाचे सुद्धा पूजन करून श्रीफळ फोडून सरपंच सौ कल्पनाताई गणेश बोडखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याच वेळी श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय मधील ध्वजारोहण विजय गणगणे यांच्या हस्ते फडकवण्यात आला तर गावांमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक श्रीगणेश केदार सर यांच्या हस्ते फडकविण्यात आला व गावातील बौद्ध विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले,
ग्रामपंचायत भावनांमध्ये ध्वजारोहण 15 ऑगस्ट अमृत महोत्सवानिमित्त विविध प्रकारचे सजावट आकर्षक झेंडे तसेच प्राणांगणात वेगवेगळे देखावे करून गावातील ग्रामपंचायत सदस्य तसेच जिल्हा परिषद शाळा सर्व शिक्षक श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे शिक्षक व ज्ञान लक्ष्मी गुरुकुल कॉन्व्हिटचे विद्यार्थी मुख्याध्यापक यांनी गावांमधून 15 ऑगस्ट अमृत महोत्सवाच्या शुभ पर्व वर गावांमधून भव्य पथनाट्य वेगवेगळ्या थोर पुरुषांचे देखावे वेशभूषा सजावट करून वेगवेगळे नाम फलक अमृत महोत्सवाची फलक विद्यार्थ्यांच्या हाती देऊन गावामधून सर्व विद्यार्थ्यांच्या हाती झेंडे घेऊन लेझीम दिंड्या पताका व बँड सह गावप्रदक्षिणा रॅली काढून विविध प्रकारचे विद्यार्थ्यांनी नारेबाजी केली, सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट देण्यात आले,
यावेळी वडाळी देशमुख सरपंच सौ कल्पनाताई बोडखे, ग्राम. सदस्य सौ नीताताई केशव बिलबिले, सौ कौशल्याताई खोबरखेडे, सौ अश्विनीताई टोहरे ,सौ पुनमताई जुनगरे, सौ मंगलाताई वाहूरवाघ, संजय खलोकार, भगवान चौधरी ,पांडुरंग रेवस्कार, जगत वाहूरवाघ ,रमेश रतन पटवारी ,पो.पा.प्रमोद मुरेकार, तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर बारब्दे, पोस्ट मास्टर निलेश खलोकार , महिला बचत गटाचे समूह अध्यक्ष सौ रेखाताई रामेकर, व सर्व महिला बचत गटाचे महिला अध्यक्ष सदस्य व ज्ञान लक्ष्मी गुरुकुल कॉन्व्हेंट सर्व शिक्षिका व मुख्याध्यापक तसेच अंगणवाडी सर्व सेविका व मदतनीस सेविका, शाळा समिती पालक वर्ग तसेच गावातील राजकीय व प्रतिष्ठित नागरिक व महिलांची यावेळी हजेरी लागली,